महावितरण कर्मचाऱ्यांच्या तब्बल चाळीस तासाच्या अथक परिश्रमानंतर वीज पुरवठा सुरळीत
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
पाचोड (विजय चिडे) रिमझिम पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बिघाड झालेल्या पाचोड-पैठण राज्य महामार्गावरील कुतुबखेडा शिवारात विद्यूत पुरवठा करणारे तीन विद्युत पोल हे शुक्रवारी सकाळी ११ वाजता पावसामुळे पडल्याने विजपुरवठा खंडीत झाला होता.परिणामस्वरुप गेल्या तब्बल ४० तास पाचोड परिसरातील २० गावे अंधारात होती. मात्र आज पाचोड (ता.पैठण) उपकेंद्रांतर्गत गावांतील विद्युत पुरवठा अखेर शनिवारी रात्री पावणे बाराच्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत सुरळीत केला.
पाचोड येथे ३३ के.व्ही.चे उपकेंद्र असून या उपकेंद्रात मेनलाईनद्वारे पैठण येथून विज पुरवठा होतो. मात्र हेच विद्युत पोल कोसळलेल्या असल्याने शुक्रवारी सायंकाळ पासुन याचे दुरुस्ती करण्याचे काम प्रगती पथावर होतं मात्र पाऊस झाल्याने सर्वत्र शेतात चिखल असताना खांबावर चढणे जिकरीचे बनले आहे. त्यामुळे विद्युत पोल उभा करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली होती.
परिणामी पाचोड उपकेंद्रातील पाचोड,मुरमा, कोळीबोडखा,पाचोड खुर्द,केकत जळगाव, सानपवाडी, लिंबगाव, रांजणगाव दांडगा सह परिसरात विद्युत पुरवठा खंडित होऊन परिसरातील वीज खंडित झाली. त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले. ज्या ठिकाणी साधे उभा येत नव्हते अखेर अशा ठिकाणी चाळीस तासांच्या अथक परिश्रमानंतर कर्मचाऱ्यांनी हे पोल उभा करून विद्युत पुरवठा सुरळीत केला आहे. विजेअभावी पिठाच्या गिरण्या बंद राहून मोबाईल चार्जिंगचाही प्रश्न निर्माण झाला होता.