गंगापूरमध्ये कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या ४४ गोवंशाची सुटका
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी/
गंगापूरमध्ये चारा, पाणी न देता कत्तलीसाठी उपाशीपोटी कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या ४४ गोवंशाची गंगापूर पोलिसांनी सुटका करून जीवनदान दिले आहे. आज संध्याकाळीही धडाकेबाज कारवाई करण्यात आली असून यात सलीम ईस्माईल कुरेशी, जुबेर आयुब कुरेशी या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गंगापूर पोलिसांच्या हद्दीत शहरात सुरू असलेल्या गोवंश कत्तलीबाबतची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी वेशभूषा बदल करुन शहरातील कुरेशी मोहल्ल्यातील मध्यठिकाणी असणार्या पत्र्याच्या शेडमध्ये मोकळया वाडयात आवारात चारा, पाणि न देता तब्बल 14 जिवंत गोवंश तर 1 मयत गोवंश जप्त केले. यानंतर गंगापुर पोलीसांनी एवढ्यावरच न थांबता आसिफ युसुफ कुरेशी, बब्बु अहमद बागेत, मुनाफ कुरेशी, अफसर कुरेशी यांच्या गंगापुर परिसरातील शेतामध्ये छापे मारुन कत्तलीकरीता आणलेल्या गोवंशाची मुक्तता केली. सदर कारवाईत गंगापुर पोलीसांनी 44 गोवंश जातीचे जनावरे, गोवंश कत्तलीकरीता वापरण्यात येणारे साहीत्य सत्तुर, चाकु, कोयता, लाकडी ठोकळा तसेच 100 किलो वजन क्षमतेचा वजन काटा व गोवंश जनावरांच्या कत्तलीनंतर उरणारी चरबी यापासुन बनविलेला डालडा असे एकुण आठ लाख अठ्ठयाऐंशी हजार रुपयाचे गोवंश व ईतर साहित्य मिळुन आले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल कृष्णा लांजेवार, गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले,पोलीस उपनिरीक्षक दिपक औटे, पोलीस उपनिरीक्षक शकील शेख, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे, महिला पोह/ 1223 शेळके, पोशि/94 नवले, पोशि/ 733 खाडे, पोशि/ 328 सिंगल, पोशि/ 841 चव्हाण, पोशि/1169 नागरे, पोशि/269 नागरे, पोशि/ 1435 नागलोत, पोशि/1027 बाप्ते, पोशि/ 1700 सोनकांबळे, पोशि/ 1530 वडमारे, पोशि/1511 कांबळे, पोशि/ 1634 राठोड, पोशि/721 गुसिंगे, पोशि/ 1528 देवकते, महिला पोशि/ 1710 पाटील, महिला पोशि/54 धारकर यांनी केली आहे.