तब्बल ३२ तासांपासून २० गावांमधील वीज पुरवठा खंडित

पाचोड (विजय चिडे) पाचोड-पैठण राज्य महामार्गावरील कुतुबखेडा शिवारात विद्यूत पुरवठा करणारे तीन विद्युत पोल हे शुक्रवारी सकाळी ११ वाजता पावसामुळे पडल्याने विजपुरवठा खंडीत झाला आहे. परिणामस्वरुप गेल्या ३२ तासापासून पाचोड परिसरातील २० गावे अंधारात आहेत. पाचोड येथे ३३ के.व्ही.चे उपकेंद्र असून या उपकेंद्रात मेनलाईनद्वारे पैठण येथून विज पुरवठा होतो. मात्र हेच विद्युत पोल कोसळलेल्या असल्याने काल सायंकाळ पासुन याचे दुरुस्ती करण्याचे काम प्रगती पथावर आहे. मात्र अद्यापही या पोलचे काम झाले नाही. त्यामूळे परिसरातील नागरिकांची फजिती झाली आहे