कामाला नाही आला म्हणून तरुणांला मारहाण

"पैठण तालुक्यातील सोनवाडी येथील घटना"

पाचोड प्रतिनिधी/  कामाला नाही आला म्हणून सोनवाडी ता.पैठण येथील दोघांनी एका (२६ वर्षीय) तरुणींला चप्पल व दगडाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असुन याप्रकरणी १) ज्ञानेश्वर किसन आल्हाट २) अनु किसन आल्हाट दोघे रा.सोनवाडी ता.पैठण यांच्या विरोधात पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पैठत तालुक्यातील सोनवाडी येथील जुमन हुजूर सय्यद( वय 26) वर्षं हा शेती व्यवसाय सह मोलमजुरी करत असतो. त्यास गावांतीलच ज्ञानेश्वर आल्हाट व अनु आल्हाट या दोघांनी कट रचून शिवीगाळ केलीय तसेच तु कामाला नाही आला म्हणून चप्पलने दगडाने वार करून डोक्यावर दुखापत केली आहे तसेच तु आमच्या नंदीला मारले आहे. त्यामुळे आम्ही तुला जीवच मारणार आहे अशी धमकी दिली या प्रकरणी जुमन हुजूर सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोड पोलीस ठाण्यामध्ये १)ज्ञानेश्वर किसन आल्हाट २) अनु किसन आल्हाट यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पवन चव्हाण हे करीत आहेत.