म्युच्युअल फंडात गुंतवणुक फायद्याची - सूर्यकांत शर्मा
पाचोड/
तरुणांनी म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करायला हवीय म्युच्युअल फंडातील गुंतवणूक अल्पकाळासाठी नव्हे तर दीर्घकाळासाठी जास्त रिटर्न मिळवून देणारी असते. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे ज्ञान असेल तर स्वतः गुंतवणूक करावी नसता एखादी कंपनी किंवा व्यवस्थापक यांच्यामार्फत गुंतवणूक करावी. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असताना एकाच वेळी मोठी गुंतवणूक न करता टप्प्या टप्प्याने गुंतवणूक करणे कधीही फायद्याचे असते. जास्त पैशाच्या लालची मुळे जास्त गुंतवणूक केल्याने नुकसान होऊ शकते. मी म्युच्युअल फंडामध्ये जोखीम मोठ्या प्रमाणात स्वीकारावी लागते.
.पंडित जवाहरलाल नेहरू, छ. संभाजीनगर व शिवछत्रपती महाविद्यालय, पाचोड च्या अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमानाने ऑनलाइन एक दिवशी राष्ट्रीय चर्चासत्र "म्युच्युअल फंड एक आर्थिक सक्षमीकरणाचे साधन" या विषयावर मार्गदर्शन करताना फार्मर डीजीएम सेबीचे सूर्यकांत शर्मा यांनी म्युच्युअल फंडात जास्त गुंतवणूक जास्त रिटर्न कमी गुंतवणूक कमी रिटर्न याप्रमाणे घडू शकते असे म्हटले. डॉ. पंडित नलावडे यांनी उद्घाटन या प्रसंगी म्युच्युअल फंडाची माहिती ग्रामीण भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीयांपर्यंत पोहोचली पाहिजे, असे म्हटले या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप चंद्रसेन कोठावळे यांनी केला.
त्यांनी असे म्हटले की, विद्यार्थ्यांसाठी म्युच्युअल फंड गुंतवणुकी संदर्भात एखादी कार्यशाळा आयोजित केली पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत देशमुख, सूत्रसंचालन डॉ. शिल्पा जिवरग मॅडम यांनी केले तर आभार डॉ. शिवाजी यादव यांनी मानले. आभासी चर्चासत्रासाठी जवळपास 140 लोकांनी ऑनलाईन चर्चासत्रात सहभाग नोंदवला. या चर्चासत्रांमधून म्युच्युअल फंडा बाबतीत असणारे समज गैरसमज दूर झाले.