शिरुर दिनांक ( वार्ताहर) शिरुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून स्मिता काळे यांनी सूत्रे स्वीकारली आहेत .यापुर्वीचे मुख्याधिकारी ॲड .प्रसाद बोरकर यांची बदली झाल्याने त्याच्या जागी काळे यांनी सुत्रे स्वीकारली आहेत . काळे यांनी यापुर्वी नागपूर महानगरपालिके सह सावनेर ,कळमेश्वर व माळेगाव येथे मुख्याधिकारी म्हणुन काम केलेले आहे. माळेगाव नगरपंचायतीस स्वच्छ्ता अभियानात त्याच्या कार्यकाळात बक्षिस मिळालेले आहे स्वच्छ व हरित शिरुर करण्याचा ही मानस असल्याचे ते म्हणाले . आपल्या कार्यकाळात स्वच्छता व नागरी सुविधा याला विशेष प्राधान्य देणार असल्याचे काळे यांनी सांगितले . शहराची पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्या बरोबरच शहर विकासाच्या विविध शासकिय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले . शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण दूर करण्याबरोबर शहरात झाडी वाढवण्यासाठी काम करु असे त्या म्हणाल्या . लोकसहभागातुन स्वच्छ व हरित शिरुर करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन ही त्यांनी केले . यावेळी त्याच्या समवेत पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक अय्युब सय्यद व वरिष्ठ आधिकारी राहुल पिसाळ उपस्थित होते .