शिरुर दिनांक (वार्ताहर ) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागाचे संचालक डाॅ. व्ही. बी.गायकवाड यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील अभ्यासकेंद्रास भेट दिली . यावेळी त्यांच्या समवेत शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम ,अभ्यासकेंद्राचे केंद्र प्रमुख व बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . के . सी मोहिते होते . गायकवाड यांनी अभ्यासकेंद्राची पाहणी करुन अभ्यासकेंद्रावरील विद्यार्थी संख्या ,सुरु असणारे कोर्सेस व अभ्यासकेंद्राचा कामकाजा संदर्भात माहिती घेवुन सुचना दिल्या . शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम व प्राचार्य डॉ . के . सी मोहिते यांनी शिरुरच्या अभ्यासकेंद्रा बाबत माहिती दिली . प्रास्ताविक केंद्र संयोजक डॉ प्रा .अंबादास केत यांनी केले केंद्र सहाय्यक निळोबा भोगावडे , प्रा सतीश धुमाळ आदी यावेळी उपस्थित होते . फोटो ओळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठच्या चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालातील अभ्यास केंद्रास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागाचे संचालक डाॅ. व्ही. बी.गायकवाड यांनी भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत सचिव नंदकुमार निकम व प्राचार्य डॉ . के . सी. मोहिते .