शिरुर दिनांक ( वार्ताहर) सकाळी साडे अकरा वाजलेले शिरुरच्या बसस्थानका समोर अचानक काही जणांच्या जमाव रस्त्यावर उतरतो . रस्त्या अडवतो. दोन गटात अपघातावरुन वाद होतो आणि हे दोन्ही गट आपआपसात भिडतात एकमेकांवर दगड फिरकावितात आणि पोलीसाच्या ताफा सायरनच्या आवाज करीत दाखल होतो. सुचना आणि अशृधूराचा वापर करीत पोलीस दंगळ सदृश्य परिस्थिती आटोक्यात आणतात . जखमी झालेल्याना रुग्णवाहिकेतुन उपचारासाठी दवाखान्यात रवाना केले जाते आणि रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरळित होते . तुम्हाला सर्वाना क्षणभर वाटले असेल शहरात उसळलेल्या दंगलीचे हे चित्र आहे . हे खरे आहे की हे दंगलीचे वर्णन आहे पण खराखु -या दंगलीचे नाही तर दंगल सदृश्य परिस्थितीचे हे वर्णन आहे . शिरुर शहरात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास ही परिस्थिती हातळण्याबाबत पोलीस यंत्रणाची व अन्य यंत्रणाच्या सतर्कतेच्या संदर्भातील रंगीत तालीम ( डेपो ) बसस्थानका समोर करण्यात आला . यात डीवायएसपी यशवंत गवारी , पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या सह अन्य सहा पोलीस आधिकारी ३० पोलीस ९ महिला पोलीस , ९ प्रविष्ट पोलीस यांच्या सह १० गृहरक्षकदलाचे जवान आदीनी सहभाग घेतला . दोन रुग्णवाहिकासह ,आग विझविण्याचा बंब ,आदी यात सहभागी झाले होते. त्याखेरीज ठिकठिकाणी चेकपोस्ट नाके करुन तिथे पोलीस तैनात करण्यात आले होते . दंगळ झालेल्या ठिकाणी पोलीस यांचे आगमन ,रुग्णवाहिका अग्निशामक दल याचे दाखल होणे , जखमीना रुग्णालयात दाखल करणे ,दंगेखोराना पकडुन पोलीस व्हॅन मधुन पोलीस स्टेशनला रवाना करणे ,जमावाला काबूत आणण्यासाठी अशृ धूरचा वापर याबाबतच्या तयारीची रंगीत तालीम यावेळी करण्यात आली . पोलीस उपअधीक्षक यशवंत गवारी व पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितले की गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्शवभुमीवर पोलीस बंदोबस्त व अन्य शासकिय यंत्रणा यांच्यातील समन्वयातील तयारीची रंगीत तालीम आजच्या डेपो द्ववारे करण्यात आली . फोटो ओळी गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्शवभुमीवर पोलीस बंदोबस्त व अन्य शासकिय यंत्रणा यांच्यातील समन्वयातील तयारीची रंगीत तालीम शिरुर बसस्थानका समोर करण्यात आली .