शिरूर दिनांक ( वार्ताहर ) जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा परिषद पुणे आयोजित तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या असून या स्पर्धेमध्ये विविध खेळामध्ये विद्याधाम प्रशाला शिरुरच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले असल्याची माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश कल्याणकर यांनी दिली.

 सी टी बोरा कॉलेज शिरूर च्या मैदानावर  या स्पर्धा  पार पडल्या. 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर धावणे, भाला, थाळी, गोळा, या  प्रकारामध्ये तसेच लांब उडी, ट्रिपल जंप यामध्ये विद्याधाम प्रशाला शिरूर च्या खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात मेडलची कमाई केली. यामध्ये एकूण 18 पदके विद्याधाम शिरूरच्या खेळाडू विद्यार्थ्यांनी पटकावली त्यापैकी 12 खेळाडूंची जिल्हा पातळीवर  निवड झाली. प्रशालेतील विद्यार्थ्यांपैकी लांब उडी स्पर्धेत वेदिका धावडे , निकिता कोकरे यांनी तर गोळा फेक स्पर्धेत सायली सातव सक्षम गवारे ,संतोष वाळके, थाळी फेक स्पर्धेत रुद्र वाळके ,आदित्य व्यवहारे ,ओम ढोबळे शंभर मीटर  धावणेत ऋतुजा बढे, साहिल सरोदे तिहेरी उडी स्पर्धेत वेदिका धावडे भालाफेक स्पर्धेत ऋतुजा बढे दोनशे मीटर धावणे स्पर्धेत रेहान शेख ,४०० मी धावणे ओंकार सकट ,हर्षद ढवळे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख सचिन रासकर शालेय क्रीडा स्पर्धा प्रमुख बारकू येवले क्रीडा शिक्षक भास्कर करंजुले मच्छिंद्र बनकर संदीप तानवडे साजिद तांबोळी कल्पना भोगावडे ,वैशाली वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे प्रशालेचे प्राचार्य प्रकाश कल्याणकर पर्यवेक्षक बाबुराव कोकाटे, गुरुदत्त पाचर्णे, देवीविजयालक्ष्मी लकडे तसेच शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा व संस्थेचे सचिव नंदकुमार निकम यांनी अभिनंदन करून  शुभेच्छा दिल्या.