शिरुर दिनांक ( वार्ताहर ) बालाजी विश्व विद्यालयात हिंदी राष्ट्रभाषा दिन साजरा करण्यात आला .

   बालाजी विश्व विद्यालयात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विविध सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी, विशेष दिन राष्ट्रीय सण उत्साहात साजरे केले जातात.  १४ सप्टेंबर रोजी हिंदी राष्ट्रभाषा दिन  साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांच्या स्वागताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी विश्व विद्यालयाचे प्राचार्य  विनायक म्हसवडे होते .

यावेळी विद्यालयाच्या उपप्राचार्या  स्वाती चत्तर समन्वयक शैला चौरे,  संदीप जामदार, शिक्षक पालक संघाचे माजी उपाध्यक्ष  दत्तात्रय कापरे, सदस्य  वसंत गव्हाणे यांनी सरस्वती व हिंदीचे प्रसिद्ध लेखक मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यालयाचे संगीत शिक्षक  काळुराम पाबळे व विद्यार्थिनी यांनी हम हैं हिंदुस्थानी, हिंद देश के निवासी, हिंदी भाषा राष्ट्र की भाषा ही हिंदी गीते गायली. विद्यार्थ्यानी हिंदी मधून कहाणी, भाषणे व गीत गायन केले. विद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख  रेशमा घार्गे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बालाजी विश्व विद्यालयाचे प्राचार्य  विनायक म्हसवडे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी मातृभाषेबरोबरच इतर भाषा देखील अवगत केल्या पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली . सुत्रसंचालन इ. १०वी च्या विद्यार्थ्यांनी केले. उपस्थितांचे आभार  योगिता सांबारे यांनी मानले .