पाजण्यासाठी नाही, तर बैल धुण्यासाठी कुठून आणणार पाणी? बैलपोळा सणावर दुष्काळाचे सावट

विजय चिडे छत्रपती संभाजीनगर,

पावसाळा लागून तब्बल सव्वा तीन महिने झाले तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकही जोरदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामूळे जिल्ह्यातील नदी नाले कोरडे ठाक पडले आहे. शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण म्हणजे सर्जा राजाचा पोळा आहे. या पळाला शेतकरी आपला सर्जा- राज्यांना अंघोळ वगैरे घालून नैवेद्य दाखवत असतो तसेच आपल्या सर्जा राजांना विविध साहित्याने नटवत असतो. मात्र यंदा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेले शेतकरी हातबल झाला आहे तसेच आपल्या सर्जा राजांना आंघोळ घालण्यासाठी शेतकऱ्यांना चक्क पाणी विकत घ्यावा लागल्याचे वास्तव्य जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहायला मिळाले आहे. जिल्ह्यातील आठवडे बाजारात पोळ्यासाठी विविध साहित्याची दुकाने थायली होती. मोलाची साथ देणाऱ्या पशुधनाचा बैलांचा पोळा हा सण साध्या प्रमाणात साजरा करण्याच्या मनसुब्यातून खरेदीदारांची गर्दी जेमतेम दिसली. 

पोळा सण बळीराजासाठी सर्वांत महत्त्वाचा सण समजला जातो. अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपरिक अन् लोकसंस्कृतीचा वारसा असलेला हा सण यंदा महागाईसोबतच दुष्काळाच्या सावटाखाली दबला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा महागाई वाढल्याने बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांचे दर वाढले असले, तरी शेतकरी गरजेपुरती आवश्यक खरेदी करीत असल्याचे दिसून आले. शेतकरी पोळा सणाला बैलांसाठी नवीन साहित्य खरेदी करून त्यांची सजावट करतात. शेतकऱ्यांनी महागाईमुळे जुनेच साहित्य वापरण्याचा निर्णय घेतल्याने यंदा बाजारात थंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसले.

(छायाचित्र विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर)