शिरुर दिनांक ( वार्ताहर ) येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचा महाराष्ट्र शासनाकडून सेंटर ऑफ एक्सलन्स प्रमाणपत्र व निधी देऊन सन्मान करण्यात आला आहे . शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयास करिअर कट्टा उपक्रम-सेंटर ऑफ एक्सलन्स प्रमाणपत्र व एक लाख रुपयाचा सन्माननिधी देऊन गौरविण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या ' करिअर कट्टा' या उपक्रमांतर्गंत महाराष्ट्रातील पंचवीस निवडक महाविद्यालयांना सेंटर ऑफ एक्सलन्स दर्जाचे प्रमाणपत्र व निधी वितरीत करण्याचा समारंभ महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या समारंभास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डाॅ.शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डाॅ.विनोद मोहितकर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे संचालक यशवंत शितोळे, राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे सर्व सहसंचालक, राज्यातील प्राचार्य व प्राध्यापकांची उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ..के.सी.मोहिते, करिअर कट्टा समन्वयक डॉ. अंबादास केत, डॉ . समाधान बोरसे, डॉ..सतीश पाटील, करिअर संसद विद्यार्थी प्रतिनिधी अजय घोबाळे इ. नी हा सन्मान स्वीकारला. प्राचार्य डॉ . के सी मोहिते यांनी सांगितले की सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गंत महाविद्यालयास पाच वर्षांच्या कालावधीत दहा लाख रुपयांचा निधी दिला जाणार असून या सेंटरच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या निवडक 100 विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय व अभ्यासिका, आाभासी अध्यापन कक्ष, करिअर संसद, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र इ. उपक्रम राबविण्यात येत आहेत. चां.ता.बोरा महाविद्यालयाने करिअर कट्टा उपक्रमाच्या सुरुवातीपासून सक्रिय सहभाग घेतला असून महाविद्यालयातील 1000 पेक्षा अधिक विद्यार्थी या उपक्रमांत सहभागी झाले आहेत. करिअर कट्टयाच्या उपक्रमांच्या यश स्वी अंमलबजावणीबाबत महाविद्यालयास यापूर्वीच पुणे जिल्हा उत्कृष्ठ महाविद्यालय म्हणून गौरविण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल, शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष .अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, धरमचंद फुलपगर, कुमारपाल बोरा आदीनी प्राचार्य,करिअर कट्टा समन्वयक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे . फोटो ओळी शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयास करिअर कट्टा उपक्रम-सेंटर ऑफ एक्सलन्स प्रमाणपत्र व एक लाख रुपयाचा सन्माननिधी देऊन गौरविण्यात आले.