मुंबई, ता. ९ : (दीपक परेराव) महाराष्ट्र विधानपरिषदमध्ये शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याने विरोधीपक्ष नेते पद शिवसेनेकडे देण्याची मागणीचा ठरावाचे पत्र विधिमंडळास दिले होते. त्या अनुषंगाने विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आ.अंबादास दानवे यांची विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदी निवड केली. यासंदर्भात अधिकृत अधिसूचना विधिमंडळ प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी आज केली. यानंतर आ.दानवे यांनी उपसभापती ना. डॉ. गोऱ्हे यांचे आभार व पक्षाचे आभार मानले. यावेळी शिवसेनेचे आ. सचिन अहिर, आ. विलास पोतनीस, आ. मनीषा कायंदे, आ. सुनील शिंदे, आ. नरेंद्र दराडे, आ. दुष्यंत चतुर्वेदी, माजी आ. विनोद घोसाळकर, विधी मंडळ सचिव राजेंद्र भागवत, सहसचिव तथा विशेष कार्य अधिकारी अनिल महाजन, उप सचिव राजेश तारवी, अवर सचिव रवींद्र जगदाळे, उपसभापती कार्यालय सचिव रवींद्र खेबुडकर, विशेष कार्यकारी अधिकारी अविनाश रणखांब उपस्थित होते.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं