शिरुर दिनांक ( वार्ताहर )बुधवार दिनांक 13 संप्टेंबर 2023 रोजी आयुष्यमान भव योजने अंतर्गत ग्रामीण रुग्णालय शिरूर येथे सर्व रोगनिदान शिबिर व आरोग्य मेळावा ( Health Camp ) आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी ससून हॉस्पिटल येथून सर्व आजारांचे विशेषज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत . दुपारी २ ते ५ शिबीराची वेळ असून नागरिकानी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालय शिरुरचा वतीने करण्यात आले आहे .