शिरुर दिनांक ( वार्ताहर ) मराठा क्रांती मोर्चा शिरुर यांच्या वतीने सोमवार दिनांक ११ संप्टेंबर २०२३ रोजी शिरुर शहर व तालुका बंद व निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे . जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकावर झालेल्या लाठीमाराचा निषेध मराठा क्रांती मोर्चाचा वतीने करण्यात आला असुन निषेध मोर्चा शहरातील सकाळी साडेदहा वाजता बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पासुन शिरुर बसस्थानका समोरुन तहसिल कचेरीवर जाणार आहे .