शिरुर दिनांक ( वार्ताहर ) साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजने कामी शहरातील बांधकाम व्यावसायिक व इमारत मालकांना सक्त सुचना देवून शहरात धूर फवारणी करावी अशी मागणी मनसेने निवेदनादवारे मुख्याधिकारी शिरुर यांना केली आहे . यासंदर्भातील निवेदनामध्ये म्हटले आहे की शिरुर नगरपरिषद हद्‌दीमध्ये सुरु असलेली बांधकामांची ठिकाणे ही साथरोग उद्रेकाचे दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरु शकतात, कारण अश्या ठिकाणी बांधलेल्या पाणी साठवणुकीच्या टाक्या, टॉयलेट, बाथरूमचं डक याठिकाणी नेहमी पाणी साठलेले असते व अशा ठिकाण डासांची उत्पती होऊन डेंग्यू, चिकणगुणिया, हिवताप या किटकजन्य साथीचा उद्रेक होऊ शकतो, ऐव्हानां डेंग्यूच्या रुग्णांची वाढ शहरात झालेली दिसुन येते. नवीन बांधकाम करणा-या जागा  मालकानां तसेच बांधकाम व्यावसायिकानां डास उत्पती होणार नाही यासाठी काळे ऑईल व रॉकेल साठवणुकीच्या ठिकाणी टाकण्याच्या सूचना कराव्यात. त्यामुळे डास अळ्यांच्या उत्पतीस प्रतिबंध होऊन डासांचा प्रभाव कमी होतो. शहरात सर्वत्र डासांचे प्रमाण वाढलेले दिसुन येते . शहरामध्ये आजाराची साथ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शिरुर शहरामध्ये सर्व भागांमध्ये तात्काळ धूरफवारणी करण्यात यावी. धूर फवारणी करताना ती फक्त रस्त्यावर न करता घरामध्येही करण्यात यावी जेणेकरून डासांची घनता कमी करण्यास मदत होईल. शहरामध्ये साथीचे आजार उदभवल्यास सर्व जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहिल याची दखल घेऊन साथ प्रतिबंधक कार्यवाही करणेत यावी असा इशारा या निवेदनात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद ,अविनाश घोगरे , रवि लेंडे व अनिल बांडे यांनी दिला आहे .