शिरूर दिनांक ( वार्ताहर) मराठा समाज बांधवाचे अंतरवाली (सराटी) येथे सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमारचा घटनेचा निषेध करीत याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी ,या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते नीलेश यशवंत वाळूंज यांनी शिरूर तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण केले. आज सकाळी या उपोषणास सुरुवात झाली. उपोषणकर्ते वाळूंज यांची भेट घेवून शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरविंददादा ढमढेरे, जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष संजय बारवकर, शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) चे गणेश जामदार, आखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर अध्यक्ष श्यामकांत वर्पे, समस्त सकल मराठा समाज संघ घोडनदीचे अध्यक्ष प्रा.सतीश धुमाळ , समस्त सकल मराठा समाज संघ घोडनदीचे विश्वस्त योगेश महाजन, यासह विविध संस्था संघटना यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वाळूंज यांनी सांगितले की जालना जिल्ह्यात मराठा समाज बांधवाचे आरक्षणाच्या संदर्भात शांततेत आंदोलन सुरु होते. मराठा समाज हा शिस्त प्रिय समाज असून समाजाने आरक्षणासाठी राज्यात अनेक मोर्चे हे लाखोंच्या संख्येने काढण्यात आले.समाजाने शांततामय व शिस्तबद्धपद्धतीने संविधानिक मार्गाने न्याय हक्कांसाठी लढा देला जालना जिल्ह्यात शांततेत आंदोलन सुरु असताना लाठीहल्ला करण्यात आला. याचा निषेध करीत या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ही त्यांनी केली. फोटो ओळी जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षण आंदोलनाचा वेळी झालेल्या लाठीमारच्या घटनेचा निषेध करीत या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी यामागणी साठी शिरूर तहसील कार्यालया समोर निलेश वाळूंज यांनी एक दिवसाचे उपोषण केले.