शिरूर दिनांक (वार्ताहर) कारेगाव, ता. शिरूर येथील सामाजिक कार्यकर्ते माणिकचंद ताराचंद ओस्तवाल यांच्या १०० व्यावाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा व १०१ ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान सोहळा गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी वृंदावन लान्स कारेगाव, ता.शिरूर येथे होणार असल्याची माहिती उद्योगपती प्रवीण ओस्तवाल व कारेश्वर पतसंस्थेचे चेअरमन सुनील ओस्तवाल यांनी दिली माणिकचंद ओस्तवाल हे काकाजी नावाने प्रसिध्द असणारे सामाजिक कार्यकर्ते असून परिसरातील विविध सामाजिक व धार्मिक कार्यात त्याच्या मोठ्या सहभाग असतो. त्याच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वाढदिवस साजरा करण्याबरोबरच परिसरातील १०१ ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान करण्यात येणार असून हा सन्मान सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी आमदार अशोक पवार, प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल, आमदार नीलेश लंके, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार उल्हासदादा पवार, सुर्यकांत पलांडे, बापूसाहेब पठारे, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे, पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के,आदी उपस्थित राहणार आहेत.