शिरुर दिनांक ( वार्ताहर )बोथरा परीवारांचे प्रथम संमेलन  पुण्यामध्ये  संपन्न झाले यावेळी अध्यक्षपदी  कांतीलालजी बोथरा यांची एकमताने  निवड झाली .

महाराष्ट्रातील समस्त बोथरा परीवारांचे प्रथम संमेलन पुणे येथील गंगाधाम चौकाजवळ असणाऱ्या वर्धमान सांस्कृतिक भवन  या मंगल कार्यालयामध्ये  दोन सत्रामध्ये संपन्न झाले.

या प्रथम संमेलनाचे आयोजन शिरूर व पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध उद्योजक  कांतीलाल पन्नालाल बोथरा यांनी केले , हे संम्मेलन होण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक शहरात  कांतीलाल बोथरा यांनी  दौरा करून सर्व बोथरा परीवारांची माहिती मिळवून या संम्मेलनासाठी निमंत्रण दिले होते,  संम्मेलनासाठी नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, जळगाव , धुळे, नाशिक, पुणे, सांगली, अहमदनगर अशा अनेक जिल्ह्यातील विविध भागातून अंदाजे सातशे ते आठशे बोथरा परीवारातील सदस्य आले होते, या कार्यक्रमाची सुरुवात महेश लुंकड यांनी आपल्या संगीतमय नवकार महामंत्राने करून दिली, त्यानंतर बोथरा परीवाराची कार्यकारिणीचा प्रस्ताव पुढे मांडण्यात आला,या कार्यकारणीच्या अध्यक्षपदासाठी  कांतीलाल बोथरा यांचे नाव सर्वानुमते , दिलीप बोथरा यांनी मांडले,त्याला अभय  बोथरा यांनी अनुमोदन दिले, त्यानंतर कांतीलालजी बोथरा यांची एकमताने अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली  .यावेळी  नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली  कार्याध्यक्षपदी गुळाचे व्यापारी व प्रसिद्ध उद्योजक श जवाहरलाल बोथरा यांची तर उपाध्यक्षपदी अहमदनगर येथील पारस उद्योग समूहाचे संचालक व बडी साजन ओसवाल जैन संस्थेचे अध्यक्ष प्रेमराजजी बोथरा, सेक्रेटरी म्हणून बालमटाकळी -पुणे येथील  संतोष बोथरा , सह-सेक्रेटरीपदी राजगुरुनगर येथील संतोष बोथरा , खजिनदार पदी चाकण येथील अभय  बोथरा यांची नावे जाहीर करण्यात आली .

 रमेश बोथरा, नरेंद्र बोथरा, धीरज  बोथरा, नितीन बोथरा, संपत बोथरा,‌ संजय बोथरा,‌ शैलेश बोथरा यांच्यासह प्रत्येक बोथरा परीवारातील सदस्यांचा समावेश यामध्ये केला जाईल असे अध्यक्ष कांतीलाल बोथरा यांनी सांगितले .

यावेळी  गणेश वंदना सादर करण्यस्त आली .  केशरचंद बोथरा व त्यांच्या परीवारातील सदस्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,.

कांतीलाल  बोथरा म्हणाले  की लवकरच संपूर्ण बोथरा परीवाराची‌ माहिती एकत्रित संकलित करून त्याची एक डिरेक्टरी प्रकाशित करण्यात येणार आहे . शैक्षणिक , वैद्यकीय व व्यावसायिक मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले . संस्थेचे कार्याध्यक्ष  जवाहरलाल बोथरा यांनी सांगितले की या संस्थेच्या अंतर्गत एक ट्रस्ट स्थापन करून परीवारातील गरजूंना शैक्षणिक, वैद्यकीय व व्यवसायासाठी आर्थिक मदत करण्याची योजना आखली जाईल. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस व पुणे शहराचे माजी नगरसेवक ॲड. अभय छाजेड,श्री, पृथ्वीराज धोका उपस्थित होते. वैजापूर येथील  अतुलजी बोथरा यांनी  स्वरबध्द केलेली‌ " म्हे बोथरा हे गीत सादर करण्यात आले . नागपूर येथील सौरभ बोथरा यांनी योगाविषयी, पुणे येथील  विजया  बोथरा यांनी विजया की जैन रसोई, अहमदनगर येथील  संतोष बोथरा यांनी आचार्य आनंदॠषीजी हाॅस्पिटलविषयी माहिती दिली . नरेंद्र  बोथरा यांनी परिवाराविषयी,श्री.जी, एम, बोथरा यांनी आधुनिक शिक्षणाविषयी , डॉ .देवेंद्र बोथरा यांनी अल्पसंख्याक विषयी, बुलढाणा येथील ॲड, विजय बोथरा यांनी संघटन व सामाजिक विषयी आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी प्रवर्तक पू, श्री,कुंदनॠषिजी म, सा, व महासतीजी पू, श्री, किरणसुधाजी म, सा, यांनी पाठविलेल्या आशिर्वाद संदेशाचे वाचन महेश लुंकड यांनी केले, त्यानंतर दुपारी या संम्मेलनाचे दुसऱ्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते, दुसऱ्या सत्रातही अनेकांनी आपले विचार मांडले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  महेश लुंकड यांनी तर  अभय बोथरा यांनी आभार  मानले.