शिक्रापुरात अचानक बंदच्या हाकेने व्यापारी व ग्रामस्थ संभ्रमात

( शिक्रापूर प्रतिनिधी ) जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असताना शिरुर तालुक्यात काही ठिकाणी दोन दिवसांपूर्वी बंद चा निर्णय जाहीर करुन त्यांनतर काही गावांमध्ये बंद पुकारण्यात आला, मात्र आज ४ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास गावातील काही संघटना व ग्रुपने अचानकपणे बंद चा निर्णय घेऊन ५ सप्टेबर रोजी गाव कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेत त्याबाबत सायंकाळी उशिरा पोलिसांना निवेदन देत गाव बंद ठेवत असल्याचा निर्णय घेतला त्यानंतर याबाबत सोशल मिडीयावर बंद बाबत संदेश प्रसारित केला मात्र शिक्रापुरातील संघटनांच्या अचानकपणे घेतलेल्या निर्णयामुळे नागरिक व व्यापारी देखील संभ्रमात पडले असून याबाबत शिक्रापूर पोलिसांशी बातचीत केली असता शिक्रापूर येथील काही ग्रामस्थांचे बंदबाबतचे निवेदन उशिरा देण्यात आलेले असून त्यावेळी तुम्ही कोणाला बंद ठेवण्याबाबत दबाव टाकू शकत नाही असे त्यांना सांगितले असल्याचे पोलिसांनी सांगितले.