चिखलाचा तुडवित रस्ता,शाळेला चल माझ्या दोस्ता..
"पैठण तालुक्यातिल हर्षी तांडा येथील प्रकार"
पाचोड(विजय चिडे) स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही तांडे,वाडया, शेतवस्त्यांवर दळणवळणासाठी पक्के रस्ते नसल्याचे चित्र पैठण तालुक्यातिल हर्षी तांडा येथील नागरिकांना सह विद्यार्थ्यांना रस्त्यासाठी जिवघेणा संघर्ष करावा लागत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
पैठण तालुक्यातील हर्षी खुर्द ग्रामपंचात अंर्तगत येणाऱ्या हर्षी तांडा येथून गावात येणाऱ्या रस्त्याची दुर्दशा कायम असून, नागरिकांना तथा विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागत आहे, मागील दहा ते पंधरा दिवसापासून चालू असलेल्या संतधर पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून वाहनधारकांना या रस्त्याने येता जाताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
निवडणुकीच्या काळात फक्त आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात हर्षी तांड्याच्या समस्याकडे लक्ष दिले जात नाही, अशी खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली, ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्याकडे प्रचंड दुर्लक्ष केले आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचे कायम दुर्लक्ष असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हर्षी तांडा येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाची वाट बिकटच आहे.पावसाळ्यात चिखल तुडवत मार्ग काढतच त्यांना ज्ञानमंदिर गाठावे लागते.
या प्रश्नाची सोडवणूक करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट सुकर करणे गरजेचे आहे. हर्षी तांडा येथे तीस-पंस्तीत कुंटुब या वाड्यावर राहणारी गावात शाळा आहे. या शाळेपर्यंतचा संपूर्ण रस्ता कच्चा आहे. उन्हाळ्यात फारशी अडचण होत नाही. पण, पावसाळ्यात विद्यार्थ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते चिखल तुडवावा लागतो. शैक्षणिक वाटेवरुन चालण्यापूर्वी विद्यार्थ्यांना या बिकट वाटेवरुन चालण्याची वेळ आली आहे. रस्त्याचा हा प्रश्न सोडवून विद्यार्थ्यांचा त्रास कमी करावा, अशी पालकांतून मागणी होत आहे.
चौकट-आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना दररोज याच चिखलातून ये-जा कराव लागत आहे. रात्री अपरात्री कोणाचे दुःख ला लागले तर इकडं वाहने आणता येत नाही. संबंधिताने तात्काळ आमच्या रस्त्याची सोय करुन द्यावे..
लखन जाधव,विद्यार्थी,हर्षी तांडा.