ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी
पाचोड: येथील शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती मंगळवारी (दि.९) सकाळी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी डॉ रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ग्रंथालय शास्त्रामधील त्यांचे योगदान स्पष्ट केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. ह.सो. बिडवे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या प्रसंगी प्रा. तुकाराम गावंडे, विलास महाजन, प्रो. डॉ. संतोष चव्हाण, प्रो. डॉ. सुभाष पोटभरे, प्रा. विनोद कांबळे, प्रा. डॉ. गांधी बाणायत, डॉ विठ्ठल देखणे, प्रा, संदीप सातोंनकर, प्रा. हेमंतकुमार जैन,प्रा. सचिन कदम, प्रा. नितीन चित्ते, उमाकांत भोसले, वैभव राऊत प्रतीक देशमुख मच्छिंद्र झिणे आधी उपस्थित होते.