छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालय मध्ये आज़ समूह राष्ट्रगीत संपन्न
बीड़ (प्रतिनिधी ) :- बीड़ शहरातील नामांकित व सह शालेय उपक्रम असो की शैक्षणिक उपक्रम यांत सातत्याने अग्रेसर असलेली श्री छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालय शाहू नगर बीड़ या शाळेत, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा बरोबरच, दिनांक 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत राज्यात स्वराज्य महोत्सव राबविण्यात येत आहे. यामध्ये आज 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वाजता इयत्ता आठवी ते दहावी चे विद्यार्थी यांनी समूह राष्ट्रगीत शाळेत येऊन गायन केले.
राज्यात स्वराज्य महोत्सव राबविण्यात येत असून याप्रसंगी विद्यार्थिनी /विद्यार्थी समवेत मुख्याध्यापक सुधाकर शिंदे तसेच शाळेतील शिक्षक श्री. दीपक पांडुरंग सरवदे व जालिंदर गेंदले यांच्या उपस्थितीत समूह राष्ट्रगीत गायन संपन्न झाले . दीपक सरवदे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना राज्यात राबविण्यात येत असलेल्या, " स्वराज्य महोत्सव अंतर्गत" शहरालगत असलेल्या ऐतिहासिक वारसा स्थळ येथे पदयात्रा काढून त्या स्थळाविषयी माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच आज उपस्थित विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुधाकर शिंदे यांच्याकडून सदरील उपक्रमाची जनजागृती करण्यात आली.