बीड/केज बेकायदेशीररित्या विक्री होणाऱ्या गुटख्याविरोधात केज पोलिसांनी उघडलेल्या मोहिमेत गेल्या काही दिवसात 36 लाख 93 हजार 35 रुपयांचा गुटखा जप्त केला होता . तो न्यायालयाच्या आदेशानंतर आज जाळून नष्ट केला . या वेळी केज पोलिसांसह काही पंचांना घटनास्थळी बोलवण्यात आले होते . गेल्या अनेक दिवसांपासून केज पोलिसांकडून विविध ठिकाणी अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात छापे मारले होते . 2021 पासून जुलै 2022 पर्यंत सहा छापे मारण्यात आले होते . यामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा , सुगंधीत तंबाखू जप्त करण्यात आली होती . तब्बल 36 लाख 93 हजार 35 रुपयांचा मुद्देमाल जमा झालेला होता . अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर अन्न भेसळ प्रशासन अधिकारी गायकवाड , केज पोलीस व पंचांच्या समक्ष सदरचा गुटखा आज जाळून नष्ट करण्यात आला . या वेळी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे उपस्थित होते .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
টেঙাঝাৰত শ্ৰীশ্ৰী উত্তৰ বেতনা শংকৰদেৱ সত্ৰৰ সপ্তাহজোৰা শ্ৰীমদ্ভাগৱত কথা সমুদ্ৰ মন্থন মহোৎসৱৰ সামৰণি
টেঙাঝাৰত শ্ৰীশ্ৰী উত্তৰ বেতনা শংকৰদেৱ সত্ৰ প্ৰাঙ্গন অনুষ্ঠিত সপ্তাহজোৰা শ্ৰীমদ্ভাগৱত কথা সমুদ্ৰ...