शिरुर दिनांक ( वार्ताहर) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी ,मेरा देश हे अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत असुन या अंतर्गत आपल्या माती विषयी जनजागृती ,प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहूती देणा-या शूरवीरांच्या सन्मान व्हावा याकरिता शिरुर नगरपरिषदेने विविध उपक्रम आयोजित केले होते .

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

या उपक्रमा अंतर्गत शिरुर शहरातील विविध भागातून मातीचे संकलन करण्यात आले . ही माती एका अमृतकलशा दवारे दिल्ली येथे पाठविण्यात येणार असल्याचे पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक अय्युब सय्यद यांनी सांगितले . आज शहरातील प्रभाग -१ ते प्रभाग १० या सर्व भागासह लाटेआळी ,हुडको कॉलनी , नदीकाठ यासह जिजामाता गार्डन अश्या विविध ठिकाणी मातीचे संकलन करण्यात आले . यावेळी पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक अय्युबभाई सय्यद , कर निरीक्षक रामचंद्र नरवडे , स्वच्छता आधिकारी दत्तात्रेय बर्गे ,चंद्रकांत पठारे ,पालिकेतील आधिकारी राहुल पिसाळ आदी उपस्थित होते . दरम्यान भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत शहरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांच्या ,माजी सैंनि कांच्या सन्मान , त्याच बरोबर पंचप्राण शपथ ,वसुधा वंदन ,ध्वजारोहण , वृक्षारोपन असे कार्यक्रम घेण्यात आल्याचे नगरपरिषद प्रशासक तथा प्रांताधिकारी हरिश सूळ व मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी सांगितले .