अवैध दारू विक्री करणाऱ्यांस पकडले 

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

"पाचोड पोलिसांची कारवाई; १३ हजाराचा मुद्देमाल जप्त"

विजय चिडे,छत्रपती संभाजीनगर,

अवैधरित्या देशी विदेशी मद्य विक्री करणाऱ्या परमेश्वर प्रभाकर मोरे यास मंगळवारी (दि.१५) रोजी सकाळी अवैधरित्या दारू विकताना पाचोड पोलीसांनी रंगेहात पकडले असून त्याच्या ताब्यातून १३ हजाराची देशी विदेशी दारूचे पाच बॉक्स ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या धडाकेबाज कारवाई ने अवैधरित्या दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, नांदर ता.पैठण येथे अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती पाचोडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांना भेटले असता त्यांनी तात्काळ परमेश्वर प्रभाकर मोरे यांच्या घरी धाड टाकली असता त्याठिकाणी तो अवैध दारू विक्री करत असल्याचे आढळून आले सदरील दारू विक्री करणाऱ्या परमेश्वर मोरे रा.नांदर ता.यास पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या कडून १३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया, पैठण पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. 

भोरे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने, स.उपनिरीक्षक गोविंद राऊत, अफसर बागवान,बोरकर यांनी ही कारवाई पार

पाडली आहे.