शिरुर दिनांक दिनांक ( वार्ताहर ) भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत "मेरी मिट्टी मेरा देश" (मिट्टी को नमन विरों को वंदन) याअंतर्गत शिरूर नगरपरिषद कार्यक्षेत्रामध्ये दिनांक ०९ ऑगस्ट २०२३ ते २० ऑगस्ट २०२३ या कालावधीत विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यामध्ये शिलाफलक अनावरण , वसुधा वंदन स्वातंत्र्यसैनिक व वीरांना वंदन , पंच प्रण शपथ घेणे ध्वजारोहण कार्यक्रम; असे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी प्रांताधिकारी हरेश सूळ व मुख्याधिकारी स्मिता काळे उपस्थित राहणार असल्याची माहिती शिरुर नगरपरिषदच्या पाणी पुरवठा अभियंता राजश्री मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली . मोरे म्हणाल्या की भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, देशात सर्वत्र "स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/ क्रांतिकारक/ स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करणेसाठी व राज्यामध्ये गाव ते शहरांपर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी यासाठी "मेरी मिट्टी मेरा देश” (मिट्टी को नमन विरों को वंदन) अभियान दिनांक ०९ ऑगस्ट ते दिनांक १४ ऑगस्ट २०२३ या दरम्यान कोणत्याही एका दिवशी राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दि. ११ ऑगस्ट २०२३ रोजी ध्वजारोहण व राष्ट्रगीत, शिलाफलकाचे अनावरण, पंचप्रण शपथ, शिरूर शहरातील स्वातंत्र्यसैनिक यांच्या परिवारातील सदस्य याचा यथोचित सन्मान व वसुधा वंदन म्हणून ७५ देशी वृक्षांच्या रोपांची सिद्धीचा माळ येथे लागवड करणे इत्यादी उपक्रम आयोजित करणेत आले आहे. दि. ०९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता पंचप्रण शपथ घेण्याचे नियोजित आहे. अभियान यशस्वी करणेसाठी शहरातील सर्व शाळा व महाविद्यालये यांना पत्राद्वारे विनंती करणेत आलेली आहे. तसेच "हर घर तिरंगा" हा उपक्रम राबविणेत येत आहे. त्यानुसार दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये नागरिकांनी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आपले घराच्या दुकानाच्या छतावर टेरेसवर किंवा इमारतींच्या टेरेसवर "हर घर तिरंगा लावणेची अंमलबजावणी भारतीय ध्वज संहिताचे पालन करून करावे व सदर उपक्रम राबविताना राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही याची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी. शिरूर नगरपरिषदेची नवीन प्रशासकीय इमारत येथील नागरी सुविधा केंद्र येथे ध्वज विक्रीस ठेवण्यात आलेले आहे. दिनांक १६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२३ यादरम्यान शहरातील प्रत्येक प्रभागातील आणलेली माती एका कलशामध्ये गोळा करून त्या कलशावर शहराचे नाव पेंट करून किंवा रेडियमने लिहून जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमा करण्याचे नियोजन करणेत आले असल्याचे मोरे यांनी सांगितले . सदरचे अभियान यशस्वी होणेकरीता शिरूर नगरपरिषदेतर्फे स्थानिक लोकप्रतिनिधी, युवक मंडळ, महिला बचत गट, सर्व नागरिक यांना अभियान मध्ये सहभागी होणेचे आवाहन करण्यात आले आहे . या पत्रकार परिषदेस ,प्रशासकीय आधिकारी राहूल पिसाळ , नगर रचनाकार पंकज काकड , कार्यालयीन अधीक्षक अय्युब सय्यद आदी उपस्थित होते .