जिल्हा प्रतिनिधी :-  प्रफुल साठे

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती अकोला येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष श्री गणेश भाऊ सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये ही भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सुरुवात सिटी कोतवाली चौक ते रेल्वे स्टेशन अण्णाभाऊ साठे चौक पर्यंत निघाली असून सर्वप्रथम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अकोला जिल्ह्याचे सिटी कोतवाली ठाणेदार श्री दुधगावकर साहेब तसेच समितीचे अध्यक्ष श्री गणेश भाऊ सपकाळ तसेच आदरणीय सुजात आंबेडकर यांनी प्रथमच या रॅलीमध्ये येऊन रॅलीची शोभा वाढवून वंदन केले .

या रॅलीमध्ये हजारो समाज बांधवांनी सहभाग घेतला होता. ही रॅली यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले सोनू इंदुरकर संजय सपकाळ विशाल झाडे करण वाघमारे संतोष सपकाळ गोकुळ मानकर गजानन दांडगे सर तसेच नागेश गवळी नंदनी आढाव बेबाबाई इंदुरकर आशा गवई उषा लोखंडे तसेच यावेळी श्री ठाणेदार वायदंडे साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .

या रॅलीमध्ये अफाट जनसमुदाय उपस्थित होता ही रॅली डीजे च्या सुरात बँड बाजा च्या गजरात मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली.