अशोक पवारांना घेऊन वाबळेवाडीत येतो अडवून दाखवा
शिक्रापूर ग्रामस्थांचा वाबळेवाडीतील ठराविक ग्रामस्थांना इशारा
शिक्रापूर दि. ३ : शिक्रापूर ता. शिरुर येथील वाबळेवाडी हे स्वतंत्र हाव नसून गावचीच एक वाडी आहे मात्र येथील मुठभर ग्रामस्थ ग्रामसभा घेतल्याचा दावा करत आमदार अशोक पवार यांना गावबंदीचा निर्णय जाहीर केला हे चुकीचे असून काही प्रसार मध्यम व सोशल मिडीयाला हाताशी धरुन चुकीची माहिती पसरवली जात असून आम्ही आमदार अशोक पवार यांना घेऊन वाबळे वाडीमध्ये येतो हिंमत असेल तर अडवून दाखवा असा इशारा शिक्रापूरच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
वाबळेवाडी ता. शिरुर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये घडलेल्या गैरप्रकाराबाबत चौकशी होऊन देखील पुढील कार्यवाही होत नसल्याने आमदार अशोक पवार यांनी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केल्याने वाबळेवाडी शाळेशी हितसंबंध असलेल्या ठराविक लोकांनी महिलांना पुढे करुन महिलांना आमदार अशोक पवारांच्या विरोधात बोलण्यास भाग पाडल्याने महिलांनी आमदार अशोक पवार यांना आम्ही बंदी घातली असून ते येथे आल्यास त्यांना काळे फासू असा इशारा होता, त्या पार्श्वभूमीवर शिक्रापूरचे माजी सरपंच बापूसाहेब जकाते, आबासाहेब करंजे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक अरुण करंजे, बाजार समितीचे माजी संचालक बाबासाहेब सासवडे, सोमनाथ भुजबळ, उपसरपंच मोहिनी मांढरे, माजी उपसरपंच मयूर करंजे, सुभाष खैरे, रमेश थोरात, विशाल खरपुडे, दिलीप वाबळे, ग्रामपंचायत सदस्या पूजा भुजबळ, सारिका सासवडे, वंदना भुजबळ, सिमा लांडे, कविता टेमगिरे, काकासाहेब चव्हाण, विठ्ठल सोंडे, बाबा चव्हाण, वाबळे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य काळूराम वाबळे, बाळासाहेब वाबळे, बापूसाहेब वाबळे, भरत वाबळे, सोसायटी अध्यक्ष अनिल राऊत, उपाध्यक्ष बाळासाहेब राऊत, संदीप गायकवाड, सुनील भूमकर, श्री गणेश ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब करंजे, उपाध्यक्ष विलास भालके, महेश मासळकर, अमित राऊत, रमेश भुजबळ, सुरेश दिघे, यांसह आदी उपस्थित होते. दरम्यान यावेळी बोलताना यापूर्वी शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे व काही सदस्यांनी शाळेबाबत चुकीची माहिती देत आपल्यावर अन्याय होत असल्याचा डिंगोरा पिटला असल्याचे देखील सदर पदाधिकाऱ्यांनी सांगितले असून सध्या चुकीच्या पद्धतीने चाललेले काम व महिलांना पुढे करुन सुरु असलेले कृत्य थांबवावे अन्यथा जशाच तसे उत्तर दिले जाईल असे सांगत आमदार अशोक पवार यांना घेऊन वाबळे वाडीमध्ये येतो हिंमत असेल तर अडवून दाखवा असा इशारा देखील सदर ग्रामस्थांनी दिला आहे.