शिरुर दिनांक ( वार्ताहर )माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे जीवन कार्य समाजाला दीपस्तंभाप्रमाणे आधार देणारे होते .अश्या शब्दांत शिरुरचे माजी आमदार लोकनेते बाबूराव पाचर्णे यांना आदरांजली ज्येष्ठ्य समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी वाहिली . शिरुर चे माजी आमदार पाचर्णे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्याच्या स्मारकाचे लोकार्पण आज करण्यात आले . यावेळी रामाणायाचार्य ह .भ .प . रामराव महाराज ढोक यांचे प्रवचन झाले . त्यानंतर झालेल्या अभिवादन सभेस ज्येष्ठ्य समाजसेवक अण्णासाहेब हजारे , माजी महसूल राज्य मंत्री सुरेश धस ,आमदार ॲड .अशोक पवार ,माजी आमदार सूर्यकांत पलांडे ,पोपटराव गावडे , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद भाजपाचे जिल्हाचे नेते ॲड धर्मेंद्र खांडरे , मालतीताई पाचर्णे ,कर्नल महेश शेळके ,जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती गणपतराव फुलवडे , जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री पलांडे , आशाताई बुचके वीरधवल जगदाळे , देवदत्त निकम ,बाजार समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल , आबासाहेब सोनवणे ,पांडुरंग थोरात ,प्रा डॉ. राजेराम घावटे ,दादापाटील फराटे ,दौलतराव खेडकर , बी .जी पाचर्णे , संजय बारवकर ,रवींद्र धनक ,धनश्री मोरे ,लाभेश औटी , अशोक शेळके यावेळी उपस्थित होते . हजारे म्हणाले की पाचर्णे यांचे आचार विचार शुध्द होते . जी माणसे आपल्या जीवनात यश अपयश याची चिंता न करता चालत असतात ती समाजाला दिशा देण्याचे काम करतात. आमदार पाचर्णे याच्या कामाची प्रेरणा जनतेला मिळावी असे ही ते म्हणाले . सुरेश धस म्हणाले बाबूराव हे लोकनेते होते .असा असामान्य नेता पर्यत होणे नाही सातत्याने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम त्यांनी केले अश्या शब्दांत आदरांजली वाहिली . आमदार ॲड अशोक पवार म्हणाले बाबुराव पाचर्णे यांनी राजकारणाच्या पलीकडे जावुन मैत्र जपले . उपस्थिताचे आभार राहुल पाचर्णे यांनी मानले . यावेळी हजारो कार्यकर्त्यानाची उपस्थिती होती आमदार पाचर्णे यांच्या आठवणीने अनेक कार्यकर्त्याना गहीवरुन आले त्याच्या स्मारकावर अभिवादन करताना कार्यकर्त्याना भावना अनावर होत होत्या .