वाशिम शहरात संभाजी भिडे यांची सभा 30 जुलै रोजी ठेवण्यात आलेली आहे ती सभा रद्द करा अन्यथा उधळून लावू असा इशारा देत वाशीम जिल्हाधीकाऱ्यांना निवेदन बहुजन समाज पार्टी ने दिले आहे.
संभाजी भिडे हा माथेफिरु असून नेहमिच फुले शाहू आंबेडकर विचार धारेच्या विपरीत वक्तव्य करत असतो.sc,st,obc,व महिलांच्या बाबतित जानिवपुर्वक अपमान जनक वक्तव्य करुन समाजात जातिवाद पसरवत असतो अशा जातिवादी मानसिकता असलेल्या भिडे ची सभा रद्द करण्यात यावी कारण की महापुरुषांचा अपमान, महिलांचा अपमान बहुजन समाज पार्टी कधिही खपऊन घेनार नाही तरी शासनाने प्रशासनाने या निवेदनाची गंभिर दखल घेउन ही सभा रद्द करावी, अन्यथा बहुजन समाज पार्टी वाशिम जिल्ह्याच्या वतिने ही सभा उधळुन लावण्यात एईल असे या निवेदनात म्हटले आहे.या वेळी जिल्हा प्रभारी प्रा गोविंद वैद्य, महिला आघाडिच्या जिल्हाध्यक्षा अनिता ताई मनवर, विनोद अंभोरे,समाधान सुर्वे, गौतम सुर्वे, मोहनराव खिल्लारे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.