किरकोळ कारणावरून गळफास घेऊन पती-पत्नीची सोबत आत्महत्या,

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

"पती-पत्नी आत्महत्या केलेली दोन चिमुकल्या झाल्या पोरख्या"

विजय चिडे छत्रपती संभाजीनगर/

छत्रपती संभाजी नगरच्या पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी येथील पती-पत्नीच्या किरकोळवादामध्ये दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्याची धक्कादायक घटना शुक्रवारी साडे सातच्या दरम्यान उघडकीस आली असून राजू दामोदर खंडागळे वय 28 व त्यांची पत्नी अर्चना राजू खंडाळे वय24 असे गळफास घेऊन आत्महत्या केलेले दाम्पत्याचे नाव आहे‌.

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,राजू व पत्नी अर्चना खंडाळे यांच्यामध्ये थोडासा किरकोळ वाद होता हे दोघेजण कामे निमित्त शेतामध्ये गेले असता. सायंकाळी उशिरापर्यंत घरी आले नाही. त्यामुळे घरातील नातेवाईकांनी शेतामध्ये जाऊन त्यांचा शोध घेतला असता ते एका झाडा गळफास घेतल्याचे आढळून आले. राजू व अर्चना खंडागळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याने आता त्यांची दोन मुली पोरख्या झाल्या असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांना मिळत त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन राजू व पत्नी अर्चना खंडाळे दोघांची मृत्यूदेह खाली उतरून उत्तरीय तपासणीसाठी बिडकीन येथील रुग्णालयात दाखल केले आहेत.