शिरुर दिनांक ( वार्ताहर )शिरुर उपविभागीय येथे उपकार्यकारी अभियंता म्हणून सुमीत वैजीनाथ जाधव यांनी पदाची सूत्रे स्वीकारली आहेत . यापूर्वीचे उपकार्यकारी आधिकारी माने यांची पदोन्नतीपर बदली झाल्याने त्यांच्या जागी जाधव यांनी सुत्रे स्वीकारली आहेत . यापुर्वी जाधव हे ऑक्टोबर २०१९ ते जुलै २०२३ या काळावधीत करमाळा ,जि. सोलापूर येथील उपविभागात कार्यरत होते. तत्पुर्वी बीड व अकलूज येथे त्यांनी काम केले होते. लोकाभिमुख प्रशासन राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले .