शिरूर दिनांक (वार्ताहर ) शासनाच्या वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष योजना अंतर्गत शिरुर नगरपरिषदेस ३५ लाख रुपये किमंतीचे जेटिंग मशीन प्राप्त झाले आहे .

याबाबतची माहिती देताना मुख्याधिकारी ॲड . प्रसाद बोरकर यांनी सांगितले की शहरात भुयारी गटार बांधण्यात आलेले असून शिरूर नगरपरिषदेचे क्षेत्रफळ 6.4 चौ. किमी इतके आहे. संपूर्ण शहरात 28 ते 30 किमी भुयारी गटारीचे जाळे विस्तारलेले आहे. सदरचे भुयारी गटार स्वच्छता करणे, चोकअप काढणे, मैला काढणे अशा प्रकारच्या कामांमध्ये अडचणी निर्माण होत होत्या. भुयारी गटार स्वच्छता करण्याचे काम यांत्रिक पद्धतीने केल्यास सुलभ व सोयीचे होईल आणि त्यामुळे नगरपरिषदेच्या स्वच्छतेच्या कामात गतिमानता वाढेल तसेच स्वच्छ भारत अभियानाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सफाई कामगारांना काम करणे देखील सुरक्षित होईल.शासनाचे वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानातून शिरूर नगरपरिषदेसाठी जेटिंग मशीन खरेदी करणे कामी 35 लाख रु चा निधी मंजूर झालेला होता. या जेटिंग मशीन ची क्षमता ३००० लिटर इतकी आहे . जेटिंग मशीन नुकतेच नगरपालिकेत दाखल झाले. त्यावेळी शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ॲड . प्रसाद बोरकर, स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता राजश्री मोरे, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे, शहर समन्वयक शुभम निचित, स्वच्छता विभागाचे मुकादम मनोज अहिरे व सागर कांबळे , शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. सुभाष पवार , माजी नगरसेवक विनोद भालेराव , शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरार आदी उपस्थित होते. दरम्यान शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात यांनी सांगितले की सदर जेटिंग मशीन मिळण्याकामी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याकडे सातत्याने पाठपुरवा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष योजनेतर्गत ३५ लाख रु किमंतीचे जेटिंग मशीन उपलब्ध करुन दिले असल्याचे सांगितले .