शिक्रापुरात फोटो व्हायरल करण्याची धमकी देय महिलेवर बलात्कार
( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथे व्यवसायातून ओळख झालेल्या महिलेला धमकी देऊन महिलेचे फोटो काढून फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार करुन महिलेकडून काही पैसे उकळल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सुरज राजेभाऊ सावंत याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील पिडीत महिलेच्या व्यवसायातून महिलेची ओळख सुरज सावंत याच्या सोबत झालेली असताना सुरज महिलेच्या घरी आला त्याने महिला एकटी असल्याचा फायदा घेय महिलेशी जवळीक करुन फोटो काढले नंतर सदर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेच्या मुलाला मारण्याची धमकी देत महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला, मात्र भयभीत झालेल्या महिलेने कोणालाही काही सांगितले नाही त्यांनतर काही दिवसांनी पुन्हा सुरज महिलेच्या घरी आला त्याने महिलेला धमकी देत महिलेवर पुन्हा अत्याचार करत व्हिडिओ काढले, मात्र सुरज इतक्यावर थांबला नाही तर त्याने महिलेचे फोटो व व्हिडिओ तिच्या पतीला पाठवण्याची धमकी देऊन तिच्याकडून काही पैसे देखील उकळले, तर सुरज याचा जास्त त्रास होऊ लागल्याने महिला तिच्या वडिलांच्या घरी गेलेली असताना सुरज वारंवार फोन करुन त्रास देत होता, यावेळी महिलेने फोन उचलून तू काहीही कर असे म्हटले असता सुरज याने महिलेच्या पतीला काही मेसेज केले त्यामुळे महिलेने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगत शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठले, याबाबत पिडीत महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी सुरज राजेभाऊ सावंत सध्या रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. शिंदखेडा ता. शिंदखेडा जि. धुळे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे हे करत आहे.