शिरुर दिनांक ( वार्ताहर ) भारत माता कि जय, वंदे मातरमच्या जयघोष करीत कारगील युध्दात प्रत्यक्ष युध्दभूमीवर पराक्रम गाजविणारे गोलेगाव, ता. शिरूर येथील सुपुत्र कॅप्टन हनुमंत धोंडीबा भोगावडे यांच्या विशेष सन्मान कारगील विजय दिनानिमित्त त्याच्या घरी जावून डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम शिरूर यांच्या वतीने करण्यात आला. या सत्काराने भारावेल्या कॅप्टन भोगावडे यांनी सैन्यदलात भरती होण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन करून कारगिल युद्धभूमीवरील प्रत्यक्ष अनुभव कथन केले. कारगील विजयदिनानिमित्त डेक्कन एज्युकेशन स्कूल शिरूर यांच्या वतीने दरवर्षी कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. आज सकाळी स्कूलचे विद्यार्थी गोलेगाव या ठिकाणी राहत असेलल्या कॅप्टन भोगावडे यांच्या घरी पोहोचले. त्याच्या घरासमोर सुंदर अशी रांगोळी विद्यार्थ्यांनी काढली. त्यानंतर उपस्थित विद्यार्थिनीनी भोगावडे आणि त्यांच्या पत्नी जयश्री यांचे औक्षण केले. त्यानतंर त्यांना पेढे भरवले व देशभक्तीपर पुस्तके , शाल, गुलाबाची फुले देवून त्याच्या सन्मान केला. यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय व वंदे मातारमच्या जयघोष केला. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतना व त्यांच्या प्रश्नांनाची उत्तरे देताना कॅप्टन भोगावडे म्हणाले की मी वयाचा १९ वर्षी म्हणजे सन १९७१ मध्ये रॉयल मराठा इन्फन्ट्री मध्ये सहभागी झालो होतो. श्रीलंका येथे शांती सेनेत तीन वर्ष काम केले. त्यानंतर पंजाब व मणिपूर येथे काम केले. सन १९९९ मध्ये कारगील युद्ध सुरु होण्यापूर्वी मणिपूर येथे होतो. जानेवारी महिन्यात जम्मू काश्मीर मध्ये बेस कॅम्पला आलो. कारगील युद्धभूमी वरील परिस्थिती सांगत असताना त्यांनी सांगितले की सर्वत्र बर्फ पडलेले असायचे पाकिस्तानचे सैन्य हे उंच भागात दडून बसलेले होते. रॉयल बटालियन मध्ये आम्ही एकूण ६०० जण होतो. व प्रत्येकाचा मनात कोणत्याही परीस्थितीत जिंकायचं असा दृढ निश्चय होता. त्यामुळे किती ही संकट आली तरी आम्ही डगमगलो नाही. जेवणाची पाकिटे ही हवाई मार्गाने आमच्या पर्यत पोहोचवली जात असायची. आमच्या सर्वांचा मनात एकच विचार होता तो म्हणजे विजय मिळविणे व त्यादृष्टीने आम्ही सर्वजण लढत होतो. आणि शेवटी आम्ही विजयही मिळविलाच असे त्यांनी बोलताना सांगितले. देशसेवेसाठी सैन्यात सहभागी व्हा असे आवाहन करतानाच बदलते युद्धतंत्र व युध्दात वाढत असणारा तंत्रज्ञानाचा वापर यामुळे चांगले शिक्षण घ्या व मग सैन्यात जा असे भोगावडे म्हणाले. आयुष्यात शिस्त, व्यायाम व सकारात्मक विचार व सेवाभाव जपा, आई वडील व कुटुंबीयाची सेवा करा इतरांशी स्नेह व आदराने वागा असे ही ते विद्यार्थ्यांना म्हणाले. पत्नी जयश्री भोगावडे यांनी सांगितले की पती हनुमंतराव भोगावडे हे युद्धभूमीवर असताना त्यांची कोणतीच ख्यालीखुशाली कळत नव्हती . पत्र ही येत नव्हते . त्यामुळे आम्ही सारे कुटुंबीय काळजी करायचो . परंतु सासरे धोंडीबा हे आम्हा सर्वांना धीर देत व सांगत की माझ्या मुलगा देशसेवेसाठी गेला असून तो युद्धभूमीवरून सुखरूप येणार हा मला विश्वास आहे. तुम्ही काळजी करू नका असे सांगून सर्वाना धीर देत. आपले पती हनुमंत यांच्या कारगील युध्दातील सह्भाग या आमच्या साठी अभिमानाची बाब असल्याचे सांगताना त्याचे डोळे गहिवरून आले. डेक्कन एज्युकेशन स्कूल इंग्लिश मिडीयम स्कूल शिरूरचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांनी सैनिकाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली जबाबदारी असून कारगील युद्धातील सहभाग घेतलेले कॅप्टन भोगावडे यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला हा विद्यार्थ्यांचा आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग असल्याचे सांगून कारगील युध्दा बाबतची माहिती ओंकार यांनी दिली. त्याच बरोबर शाळेच्या वतीने सैनिकच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणा-या कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरूरचे उपाध्यक्ष प्रा. सतीश धुमाळ यांनी कॅप्टन भोगावडे यांच्या परिचय करून दिला. यावेळी शिक्षक अमोल वाघमारे, अक्षता दिवेकर, मोनाली जाधव हे उपस्थित होते. भोगावडे हे सन २००० मधून सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले असून त्यांना पोलीस पाटील  संदीप व  बांधकाम व्यवासायिक सचिन अशी दोन मुले व शिक्षीका व कराटेपटु अनिता  व आशा  दोन मुली आहेत . व भोगावडे हे सध्या गोलेगाव येथे राहणास आहेत.

Sponsored

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट - बूंदी

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |