शिरुर दिनांक ( वार्ताहर ) 11 वर्षीय अल्पवयीन मुलीस राहत्या घरी जेवण न करण्याच्या कारणामुळे मारहाण व चटके दिल्या प्रकरणी मुलीच्या आईच्या विरोधात बाल न्याय अधिनियम 2015 चे कलम ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली आहे . यासंदर्भात पोलीसानी दिलेल्या माहिती नुसार कारेगाव येथे ११ जुलै ते 25 जुलै 2023 च्या दरम्यान हा प्रकार अल्पवयीन मुलीचा घरी घडला. यातील आरोपी हिने तिची मुलगी पीडित वय 11 वर्षे हील तिच्या राहत्या घरी जेवण न करण्याच्या कारणामुळे लाकडी काठीने हातावर,पायावर,पाठीवर मारहाण करून लोखंडी चमच्याने हातावर पायावर चटके दिले व दुखापत करून शिवीगाळ दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे याप्रकरणी पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बनकर तपास करीत आहेत