शिक्रापुरात सावत्र बापाकडून अल्पवयीन युवतीचा विनयभंग

( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील एका बारा वर्षीय युवतीची आई कामाला गेलेली असताना तिच्या सावत्र बापाने युवतीसोबत अश्लील कृत्य करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, दरम्यान युवती तिच्या सावत्र बापाला प्रतिकार करत असताना त्याने तू कोणाला काही बोलली तर मी तुला खल्लास करुन फेकून देईल अशी धमकी दिली, त्यांनतर युवतीची आई घरी आली असता युवती रडू लागल्याने आईने रडण्याचे कारण विचारले असता युवतीने घडलेला प्रकार आईला सांगितला, याबाबत युवतीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी युवतीच्या सावत्र बापावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे व पोलीस शिपाई अविनाश पठारे हे करत आहे