शिरुर  दिनांक ( वार्ताहर )शिरुर शहर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अध्यक्ष पदी शरद वसंत कालेवार यांची निवड करण्यात आली आहे . यासंदर्भात जिल्हाध्यक्ष ( अजितदादा पवार गट ) प्रदीप गारटकर यांनी कालेवार यांना निवडीचे पत्र दिले आहे . कालेवार हे शिरुर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी सभापती असुन शिरुर तालुका रेशन दुकानदार संघटनेची ही पदाधिकारी आहेत . त्याच्या पत्नी मनिषा कालेवार या जिजामाता सहकारी महिला बॅकेच्या संचालिका असुन शिरुर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका ही आहेत . निवडी नंतर बोलताना नवनिर्वाचित शहराध्यक्ष शरद कालेवार म्हणाले की सन १९९१ ला बारामती लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार हे बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी उभे होते त्यावेळी शिरुर विधानसभा मतदार संघ बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग होता तेव्हा पासुन अजित पवार यांच्या समवेत आहे . माझ्यावर संघटनेने जी जबाबदारी सोपविली ती प्रामाणिकपणे पार पाडेल असे ही त्यांनी सांगितले . निवडी नंतर राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे,शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती अविनाश मल्लाव  ,माजी  जिजामाता महिला सहकारी बॅकेच्या संचालिका मनिषा कालेवार , दौलतराव खेडकर , शशिकला काळे , माधव मुंडे , नितीन खांडरे यांनी कालेवार यांच्या सत्कार केला .