शिरुर दिनांक ( वार्ताहर ) फियाट कंपनीतील सायलन्सरचे भाग असणारे  ८ लाख ४० हजार रुपये किमंतीचे पार्ट काढुन कंपनीचा बाहेर विक्री केल्या प्रकरणी सप्लाय मॅनेजर अतिषकुमार शिवाजी कांबळे रा. मांजरडे ता. तासगाव जि. सांगली ४१६३१२ सध्या रा. प्लॉट नं. ६०१  ए निर्माण अल्टीस रेडसन ब्यु हॉटेलचे पाठीमागे खराडी ता. हवेली जि.पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . यासंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितेनुसार रांजणगाव पोलीस ठाण्यात सुशांत शंभु शुक्ला वय ५३ वर्षे व्यवसाय. सिक्युरीटी ऑफीसर फियाट कंपनी रा. प्लॉट नं. ३९, १० वा मजला, एल-२, पामग्रोज हाऊसिंग सोसायटी, बी.टी. कावडे रोड घोरपडी पुणे यांनी फिर्याद दिली आहे . आरोपी अतिषकुमार शिवाजी कांबळे यांनी फियाट कंपनीतील सायलेन्सर युरो 6 बी यामधील हॉट एंड सीपीएल सीसीडीपीई पार्ट नंबर ( 00505411420E) हॉट एन्ड सी पी एल हा पार्ट सायलेन्सर कट करून त्यामधुन एकुन ८,४०,०००/- रूपये किंमतीचे पार्ट काढुन कंपनीचे बाहेर काढुन विक्री केली असले बाबत फिर्याद देण्यात आली आहे. याबाबतचा आधीक तपास पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सरजिने करित आहेत .