शिरुर दिनांक आनंददायी शिक्षणा बरोबरच आरोग्याचा चांगल्या सवयी लागाव्यात मुलांच्या सर्वागीण विकास करणे या हेतूने शहरातील भिल्ल पारधी वस्तीवर माहेर संस्थेचा वतीने अंकुर किलबील गमंत शाळा सुरु करण्यात आली आहे . कोरोनाचा काळात बंद झालेली ही शाळा पुन्हा यंदाच्या वर्षी नव्या जोमाने सुरु झालीमुलांच्या किलबिलाटाने शाळेचा परिसर सुखावून गेला होता . या वेळी माहेर संस्थेचा ल्युसी  कुरियन , हिराबेगम मुल्ला ,माजी नगरसेवक संदिप गायकवाड, परदेशी पाहुण्या निकोलस , लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक ,प्रकाश कौठाळे , गमंत शाळेच्या शिक्षिका वैष्णवी धुळे , बालरोगतज्ञ डॉ. सतीश आंधळे , सलीम भोसले , भगत भोसले विजय तवर आदी उपस्थित होते . माहेर संस्था यांच्या वतीने अश्या प्रकारची गमंत शाळा पश्चिम बंगाल मधील कलकत्ता , महाराष्ट्रातील सांगली ,पुणे येथील पेरणे फाटा व शिरुर येथील भिल्ल पारधी वस्तीवर चालविली जाते . शिरुर येथील भिल्ल पारधी समाजातील मुले शिक्षणापासून दूर राहु नयेत. शिक्षणा विषयी गोडी निर्माण व्हावी . स्वच्छता व आरोग्य विषयक चांगल्या सवयी मुलामध्ये निर्माण व्हाव्यात त्याच बरोबर विविध खेळाच्या ,गाण्याच्या माध्यमातुन शिक्षणाची आवड निर्माण व्हावी याकरिता गमंत शाळा सुरु करण्यात आली असल्याचे माहेर संस्थेचे विजय तंवर यांनी सांगितले . सध्या या शाळेत २२ विद्यार्थी असुन सकाळी १० ते दुपारी २ अशी शाळेची वेळ असुन मुलाना खेळ गप्पा गोष्टी द्वारे शिकविले जाते व दररोज नाष्टा ही दिला जातो. छोटी मोठी कामे करुन उदरनिर्वाह करणा- या पालकांची मुले या शाळेत असल्याचे तवर यांनी सांगितले . माहेर संस्थेचा ल्युसी  कुरियन यांनी सांगितले की वंचित घटकातील मुलांना शिक्षण देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे . माहेर संस्थेचा वतीने समाजातील विविध घटकांसाठी काम केले जाते . मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन द्या शिक्षणाने आपल्याला परिस्थिती बदलवता येते . रवींद्र धनक म्हणाले की ही गमंत शाळा विद्यार्थ्याच्या सर्वागीण विकास करण्यासाठी महत्वपुर्ण योगदान देणारी आहे विद्यार्थ्याचा आयुष्य व जीवनाला या गमंत शाळे मुळे कलाटणी मिळणार असुन शाळे करिता सर्वोपतरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले . डॉ . सतीश आंधळे , यश धुळे यांनी ही मनोगत व्यक्त केले . यावेळी प्रास्ताविक योगिता म्हेत्रे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार संदिप म्हेत्रे यांनी मानले . फोटो ओळी माहेर संस्थेचा वतीने भिल्ल पारधी वस्ती वर गमंत शाळा सुरु करण्यात आली .