शिरुर दिनांक ( वार्ताहर )इन्स्टाग्राम अकाउंट वरुन  कोयत्याचे प्रदर्शन करून लोकांमध्ये दहशत माजविणारे तरुणाना  शिरूर पोलीसांनी  गजाआड केले आहे .  याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी  रोहित महादेव हरिहर 2) सिध्देश संतोष वेताळ दोघे रा. आलेगाव पागा ता. शिरूर यांचावर कारवाई करण्यात आली आहे .

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  दिनांक 22 जुलै 2023 रोजी रोजी पावणेचारच्या  सुमारास  आलेगाव पागा ता. शिरूर जि.पुणे येथे यातील आरोपी  रोहित महादेव हरिहर वय 28 वर्षे व  सिध्देश संतोष वेताळ वय 19 वर्षे रा. आलेगाव पागा, ता. शिरूर, जि पुणे यांनी  बेकायदेशीर विनापरवाना कोयत्याची मंदिरामध्ये जावुन त्याची पुजा करून सदर पुजेचा व्हिडीओ बनवुन व्हिडीओ त्यांचे इस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून सोशल मीडियावरून गावामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत.  विनापरवाना हत्यार स्वतः जवळ बाळगुन आहेत. अशा आशयाची गोपनीय माहिती  मिळाल्या नुसार केलेल्या कारवाई दरम्यान 1) आरोपी रोहित महादेव हरिहर वय 20 वर्षे 2) सिध्देश संतोष वेताळ वय 19 वर्षे रा. आलेगाव पागा, ता. शिरूर, जि पुणे यांचे ताब्यात एक लोखंडी धातुचा धार असलेला, बारा से.मीटर लाकडी मुठीपासुन लांब व चार से.मी. लांब लाकडी मुठ असलेला कोयता असे एकुण 200 /- रू किंमतीचा बेकायदेशीरीत्या विनापरवाना जवळ बाळगले स्थितीत मिळुन आलेने पोलीस अंमलदार नितेश थोरात यांनी दोघांचे विरूध्द सरकार तर्फे तक्रार दिली आहे.सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक संजय जगताप  यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले,पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील,पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार,पोलीस अंमलदार विनोद मोरे,सचिन भोई,राजेंद्र गोपाळे यांनी केली आहे.

सोशल मीडिया द्वारे अशा प्रकारचे व्हिडिओ, रिल्स, फोटो अपलोड करून दहशत माजविण्याचा प्रकार करणारे विरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनकडून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल .सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी आपले पाल्य सोशल मीडिया अकाउंट वरून कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट करणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी केले आहे.