शिक्रापूर पोलिसांनी एकाला केलं एक वर्षासाठी स्थानबद्ध

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

( शिक्रापूर प्रतिनिधी ) सणसवाडी ता. शिरूर येथील कायम वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारा केतन गोरख दरेकर यांच्या विरुद्ध शिक्रापूर पोलिसांनी दाखल केलेल्या प्रस्तावानंतर अखेर त्याला एक वर्षासाठी एम. पि. डी. ए कायद्याअंतर्ग स्थानबद्ध करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी दिले आहे.

                    सणसवाडी ता. शिरूर येथील केतन दरेकर हा परिवारात युवकांसोबत कट रचून जबरी चोरी करणे, खंडणी मागणे, हत्यारांचा धाक दाखवणे, जबर दुखापती करणे यांसह आदी स्वरूपाचे गुन्हे वारंवार करत होता, तसेच पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी अशा गुन्हेगारांवर एम. पि. डी. ए कायद्याअंतर्गत तसेच मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले असता पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार गुन्हे करणाऱ्या केतन दरेकर यांच्याविरुद्ध प्रस्ताव सादर करून पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडे सादर केला असता त्यांनी तो प्रस्ताव पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे पाठवला असता नुकतेच डॉ. राजेश देशमुख यांनी नुकतेच केतन गोरख दरेकर वय २० वर्षे रा. डोंगरवस्ती सनसवाडी ता. शिरूर जि. पुणे याच्या विरुध्द एम. पि. डी. ए कायद्याअंतर्गत एक वर्ष स्थानबद्धतेचे आदेश दिले असल्याने केतन दरेकर याला एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.