श्री क्षेत्र चाकरवाडी येथे बाळनाथ महाराज पालखी सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

नेकनुर दि ८ ( प्रतिनिधी ) : - विसाव्या शतकातील महान संत विभुती वै . ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज श्री क्षेत्र चाकवाडीकर यांच्या कृपा आशिर्वादाने गुरूवर्य तपोनिधी बाळनाथ महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले तसे याची सुरूवात सोमवारी झाली . ह . भ . प महादेव महाराज ( तात्या ) यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह मध्ये पहाटे सकाळी ४ ते ६ काकडा , सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण , १० ते १२ गाथा भजन , ४ ते ५ ज्ञानेश्वरी प्रवचन ५ ते ६ हरिपाठ , रात्री ९ ते ११ महाराष्ट्रतील सुप्रसिध्द कीर्तनकार यांचे किर्तन होणार आहे तसेच ११ ते ४ संगीत भजन व जागर होणार आहे . आणि सोमवार दि . १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९ वाजता श्री बाळनाथ महाराज पालखी मिरवणुक होईल , श्री बाळनाथ महाराज पालखी विसर्जनानंतर महाप्रसाद होईल . तसेच सायंकाळी ५ ते ८ ह . भ . प तपोनिधी शांतीब्रम्ह महादेव महाराज ( तात्या ) श्री क्षेत्र चाकरवाडीकर यांचे काल्याचे किर्तना नंतर , सायं ९ ते १२ सार्वजनिक जागर होईल . या सर्व कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री . ह . भ . प . तपोनिधी शांतिब्रम्ह गुरूवर्य महादेव महाराज तात्या श्री क्षेत्र चाकरवाडीकर , चाकरवाडी गावकऱ्यांनी केले आहे .