कोरेगाव भीमात आढळले बेवारस स्त्री जातीचे अर्भक

( शिक्रापूर प्रतिनिधी ) कोरेगाव भीमा ता. शिरूर येथील इंद्रायणी हॉटेलचे पाठीमागे फरशी ओढा लगत एका लाकडी बॉक्स मध्ये टाकून दिलेली स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                          कोरेगाव भीमा ता. शिरूर येथील इंद्रायणी हॉटेलचे पाठीमागे फरशी ओढा लगत असलेल्या जय मल्हार फेब्रिकेशनच्या समोर एका लाकडी बॉक्स मध्ये अंदाजे तीन महिने वयाच्या मुलीचा अर्भक असल्याचे किरण गव्हाणे या युवकाला दिसले, याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना मिळतात पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलीस शिपाई प्रताप कांबळे, महिला पोलीस शिपाई अपेक्षा टावरे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता एका लाकडी बॉक्समध्ये तीन महिने वयाचे अर्भक दिसून आले, दरम्यान सदर बाळाला शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले, तेथे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमा देठे, भाऊसाहेब पोळ, बाल रोग तज्ञ डॉ. संदीप वाव्हळ, आरोग्य सेविका आरती निकाळजे, यांनी बाळाची आरोग्य तपासणी केली तर याबाबत किरण रामदास गव्हाणे रा. वाडेगाव फाटा कोरेगाव भीमा ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.