बीड प्रतिनिधी: राज्यातील टीईटी उत्तीर्ण उमेदवारातील बेरोजगारी कमी होईल सात जुलै 2023 रोजी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून जिल्हा परिषद शाळेतील रिक्त जागावर कॉन्ट्रॅक्टर पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे नवीन शिक्षकांना नियुक्ती देताना सेवानिवृत्त ऐवजी टीईटी परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांना संधी देण्याची गरज आहे अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू आडे यांनी केली आहे यामुळे राज्यातील टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना संधी देण्याची गरज आहे यामुळे राज्यातील टीईटी उत्तीर्ण बेरोजगार यांची संख्या कमी होण्यास मदत होईल असे प्रतिपादन केले आहे विष्णू आडे यांनी निवेदनात म्हटले आहे वाडी वस्ती आणि तांड्यावरील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे शिक्षक भरती संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्यामुळे भरती प्रक्रियेत विलंब होत आहे ही सर्व परिस्थिती विचारात घेऊन पवित्र प्रणाली मार्फत नेहमीच शिक्षक गरज आहे भरती मधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांमधून कॉन्ट्रॅक्टर तत्त्वावर शिक्षकांची रिक्त पदे भरावे अशी मागणी झाली होती नवीन आदेशात महिना वीस हजार रुपये पगारावर कॉन्टॅक्ट शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहे राज्यात ही टीईटी परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांची संख्या पाच लाखाच्या जवळपास आहे एवढी मोठी बेरोजगारी राज्यामध्ये असताना नियुक्त शिक्षकांमधून भरती करून घेणे हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी चुकीचे धोरण आहे कार्यशक्ती संपलेल्या निवृत्ती शिक्षकाकडून काम करून घेण्यापेक्षा राज्यातील नवीन उमेद असणाऱ्या शिक्षकांकडून शिक्षणाचे पवित्र काम करून घेणे उचित ठरते चार महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने नऊ खाजगी कंपन्यांना नोकर भरतीसाठी करार केलेला आहे या कंपनीच्या माध्यमातून रजत नोकरी भरती प्रक्रिया होणार आहे या बहुजन समाजातील सामान्य तरुण बेरोजगार भरडला जाणार आहे हे मात्र निश्चित आहे