शिरूर दिनांक (वार्ताहर ) येथील सह्याद्री देवराई शिरूर येथे देशी झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले .

या  कार्यक्रमात मुंबई येथील ग्लोबल ज्वेलरी लिमिटेड  कंपनीच्या वतीने १२५ देशी झाडांचे वृक्षारोपण करुन या झाडांची तीन वर्ष संगोपन करण्याची जबाबदारी ही ग्लोबल ज्वेलरी लिमिटेड  कंपनीचा वतीने घेण्यात आली. अभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री देवराई शिरूरचा वतीने पुणे नगर रस्त्यावरील हॉटेल अंबिका शेजारील डोंगरावर देशी झाडांचे वृक्षारोपण करून संवर्धन करण्यात येत आहे. आहे . या डोंगरावर मुंबई येथील ग्लोबल ज्वेलरी लिमिटेड  या कंपनीचा वतीने त्याच्या प्रतिनिधीनी आंबा, चिंच ,जांभूळ, वड, पिंपळ, नारळ, लिंब अशी देशी झाडे व फळझाडे लावली . यावेळी सह्याद्री देवराईचे खजिनदार सचिन चंदने, सह्याद्री देवराई सांगली ,पुणे ,सोलापूर ,लातूर लोणी काळभोर येथील प्रतिनिधी ही उपस्थित होते . गेल्या काही महिन्या पासून सह्याद्री देवराई येथे लोक सहभागातून देशी झाडे व फळझाडे लावून हा डोंगर हिरवागार करण्याचा दृष्टीने काम सुरु करण्यात आले आहे. दररोज सामुहिक श्रमदान व झाडांना पाणी देणे, झाडांची निगा राखणे आदी कामे केली जात असतात. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी झाडे लावण्यासाठी व त्यांचे संवर्धन करण्यासाठी यावे असे आवाहन सह्याद्री देवराई शिरूरचा वतीने करण्यात आले आहे. पर्यावरणात होत असलेले बदल लक्षात घेता वृक्षारोपण व संवर्धन चळवळ अधिक व्यापक करण्याचा दृष्टीने सर्वोपतरी साह्य करण्याचे ग्लोबल ज्वेलरी लिमिटेड कंपनी  मुंबईचा वतीने सांगण्यात आले.