शिरूर दिनांक (वार्ताहर) निर्वी, ता. शिरूर येथे निर्वी-न्हावरा या रस्त्यांवर उसाने भरलेल्या व एक टायर नसलेल्या ट्रेलरला मोटार सायकलने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार मरण पावला. सखाराम विश्वनाथ सरके वय २७ रा. शिरसगाव काटा,, ता.शिरूर, जि .पुणे असे मरण पावलेल्याचे नाव आहे. . याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सखाराम विश्वनाथ सरके हे मोटार सायकल क्रमांक एम. एच. - १२ के . डब्ल्यू ५२३७ वरून सायंकाळी निर्वी न्हावरा रस्त्याने चालले असतना कोकरे वाडी चौकात उसाने भरलेल्या एक टायर नसलेल्या ट्रेलरला पाठीमागून मोटार सायकलने धडक दिली. त्यात जखमी होवून ते मरण पावले. याबाबत वैशाली सखाराम सरके यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विशाल कोथळकर करीत आहेत.