जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे निमित्त साधत उल्हासनगर महापालिकेतर्फे 'हर घर तिरंगा,घर घर तिरंगा, ची जनजागृती पथनाट्य द्वारी करण्यात आली हे पथनाट्य उल्हासनगर 4 मधील एसएसटी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये सादर केले याद्वारे भारत सरकार राबवीत असलेल्या मोहिमेची माहिती देण्यात आली या पथनाट्याचे दिग्दर्शन एसएसटी महाविद्यालयाचे हर्षल सूर्यवंशी यांनी केले यावेळी उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख अतिरिक्त आयुक्त करुणा जुईदुकर, अतिरिक्त आयुक्त जमिल लेगनेकर आयुक्त पर्यावरण विभाग सुभाष जाधव आयुक्त पर्यावरण विभाग नाईकवाडे तसेच पर्यावरणपूरक विशाखा सावंत उपस्थित होत्या