शिरुर दिनांक ( वार्ताहर ) " लोखंडी पाईपाने मारहाण करुन मोबाईल व रोख रक्कम चोरणारा आरोपीस पोलीसांनी जेरबंद केले आहे .जेरबंद केलेल्याचे नाव अथर्व धर्मा जाधव रा. देवदैठण, ता.श्रीगोंदा, जि. अहमदनगर असे आहे . याबाबत माहिती देताना पोलीसांनी सांगितले की कारेगाव येथील यशईन चौकामध्ये दि. १ फेबृवारी 2023 रोजी रात्री 02.00 वा. च्या सुमारास बालाजी रामराव काटकर रा. भोसरी, पुणे, मुळ रा. गंगाखेड जि.परभणी हे पुणे येथून त्यांचे मुळगावी जात असतांना पुणे नगर हायवे रोडलगत गाडीला हात करत थांबलेले असतांना स्प्लेंडर मोटार सायकल क्र .एम एच- ०९ ऐव्ही ८४३३ वरुन आलेल्या दोन अनोळखी व्यक्तीनी काटकर याचाजवळ येवुन लोखंडी पाईपाने डोक्यास पायावर मारहाण करुन गंभीर जखमी केले होते व त्याच्याकडील 8,300/-रु. रोख रक्कम व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकुण 14,300/रु.ऐवज चोरुन नेला होता. या प्रकरणी रांजणगाव बालाजी काटकर यांच्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . या गुन्हयाचे तपासामध्ये गुन्हयातील आरोपीनी वापरलेल्या मोटार सायकल क्रमांकावरुन आरोपींच्या शोध घेतला असता हा गुन्हा आरोपी अथर्व धर्मा जाधव रा. देवदैठण, ता.श्रीगोंदा, जि. अहमदनगर याने त्याचे साथीदार आरोपीच्या मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपींच्या गुन्हा घडल्यापासून तपास पथकातील सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार विलास आंबेकर, पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांनी आरोपीच्या राहत्या पत्यावर व शिरुर परिसरामध्ये शोध घेतला परंतु आरोपी हे गुन्हा घडल्यापासुन फरार होते. गोपनिय बातमीदारांचे मदतीने दि. ४ जुलै 2023 रोजी आरोपीस त्याचे राहत्या घरातुन ताब्यात घेवुन अटक करण्यात आली . अटक करतेवेळी आरोपीच्या ताब्यात गुन्हयात वापरलेली स्प्लेंडर मोटार सायकल क्र. MH 09 AV 8433 हि मिळुन आलेली आहे या गुन्हाचा तपास पोलीस अधिक्षक अंकित गोयल , अप्पर पोलीस अधिक्षक मितेश मिट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरुर यशवंत गवारी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलीस उपनिरीक्षक निलकंठ तिडके, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार विलास आंबेकर, पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे, पोलीस हवालदार संतोष औटी यांनी केला या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे हे करत आहेत.